राज्यात कोरोनाचे २३ नवे रुग्ण आढळले : एकूण रुग्ण संख्या ८९१ वर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
धारावीत आज आणखी दोन नवे रुग्ण आढळले आहेत. एकाच कुटुंबातील दोघांना म्हणजे बापलेकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे धारावीतील करोना रुग्णांची संख्या ७ वर पोहोचली आहे. आज राज्यात २३ नवे रुग्ण वाढल्याने राज्यातील रुग्णांची एकूण संख्या ८९१ वर गेली आहे.
धारावीच्या बलिगा नगरमध्ये हे दोन रुग्ण आढळले आहेत. एकाच घरातील हे दोघेही रुग्ण आहे. एका ४९ वर्षीय व्यक्तीला आणि त्याच्या ८० वर्षीय वडिलांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या कुटुंबाचं घर सील करण्यात आलं आहे. त्याशिवाय या संपूर्ण बलिगा नगरही सील करण्यात आलं आहे. बलिगानगरमधील करोना रुग्णांची संख्या चारवर पोहोचली असून त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. आता हे दोन नवे रुग्ण आढळल्याने बलिगा नगरमध्ये खळबळ उडाली आहे. हे दोन नवे रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याची माहिती घेतली जात आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-07


Related Photos