महत्वाच्या बातम्या

 आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा दावा


- आमदार डॉ. देवराव होळी यांची माहिती : उपोषण केवळ राजकीय हेतूने

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : मेक इन गडचिरोलीच्या नावाने अगरबत्ती क्लस्टर आणि मत्स्य-तलावनिर्मित फसवणूक केल्याचा आरोप काही लोक करून नाहक बदनामी करत आहेत. नागपूर येथील संविधान चौकात उपोषणही सुरू केले आहे. हे वास्तविक या प्रकरणाची चौकशी वर्षभरापूर्वी होऊन त्यात सर्वकाही स्पष्ट झाले, असताना वर्षभरानंतर केले जात असलेले आरोप राजकीय विरोधकांनी फूस लावल्यामुळे केले जात आहेत. त्यामुळे संबंधित सर्व लोकांवर आपण मानहानीचा दावा ठोकण्यासाठी नोटीसही बजावले असल्याची माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेत दिले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, संघटनमंत्री रवी ओल्लालवार महामंत्री प्रमोद पिपरे, योगिता पिपरे, मधुकर भांडेकर, विलास दशमुखे, मुक्तेश्वर काटवे, हेमंत बोरकुटे, केशव निंबोड आदी अनेक पदाधिकाऱ्यांसह गोंडवाना क्लस्टरच्या उद्योजिका उपस्थित होते. यावेळी डॉ. होळी म्हणाले, जिल्ह्यात छोट्या उद्योगांना चालना देण्यासाठी आपण संबंधिताना प्रोत्साहित केले. पण बँकेचे लोन, जिल्हा उद्योग केंद्राकडून मार्गदर्शन किंवा योजनांचा लाभ ही सर्व प्रक्रिया अधिकाऱ्यांनी नियमानुसार केले आहे.

वर्षभरापूर्वीच झाली चौकशी

या प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी वर्षभरापूर्वी केलेल्या चौकशीत सर्व प्रक्रिया नियमानुसार झाल्याचा अहवाल दिले. तक्रारकर्त्यानाही त्यांची प्रत दिली होते. मग वर्षभरानंतर आता त्यावर बोलण्याचे काय कारण, असा प्रश्न किशन नागदेवे यांनी उपस्थित केले. या प्रकरणी संबंधितांनी कायदेशीर मार्गाने न्यायालयात दाद मागावी. तिथे काय ते स्पष्ट होईल, अशी अपेक्षा डॉ. होळी यांनी व्यक्त केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos