जगभरात १२ लाखहून अधिकांना कोरोनाची लागण : इटलीत १५ हजारहून अधिकांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. जगभरात १२ लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६९ हजार ४४४ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासात १२०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सगळ्यात जास्त कहर इटलीत झाला आहे. इटलीत आतापर्यंत १५ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
युरोपीयन देशात कोरोनाचे संकट वाढले आहे. इटलीत आतापर्यंत १५ हजार ८८७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये १२ हजार ६४१  लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ६९४ जणांचा मृत्यू आहेत. स्पेनमध्ये एकूण १ लाख ३१ हजार ६४६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
अमेरिकेतही कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३ लाख ३७  हजार ३१० जणांना लागण झाली आहे.
  Print


News - World | Posted : 2020-04-06


Related Photos