पालघर येथे तिसऱ्यांदा भूकंपाचा जोरदार धक्का : अनेक घरांच्या भिंतींना गेले मोठे तडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पालघर :
जिल्ह्याला आठवड्यात तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला. तलासरी तालुक्यातील सावरोली, कोचाई आदि भाग भूकंपाच्या आजपर्यंतच्या सर्वात जोरदार झटक्याने हादरले. भूकंपाचा धक्का इतका जोरदार होता की यामुळे अनेक घराच्या भिंतींना मोठे तडे गेले.
सोमवारी मध्यरात्री १२ वाजून १८ मिनीटांनी बसलेल्या हादऱ्यानंतर अनेकांनी जिवाच्या भीतीने घराबाहेर पळ काढला. या भूकंपामुळे पालघर जिल्ह्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा भूकंप किती रिश्टर स्केलचा होता हे अद्याप समजू शकले नाही.
या अगोदर याच आठवड्यात बुधवारी १ एप्रिल ला  रात्री ११ वाजून ३९ मिनिटांनी आणि शुक्रवारी रात्री ११ वाजता डहाणू, पालघर व तलासरी तालुक्यात भूकंपाचे लागोपाठ दोन धक्के जाणवले होते. भूकंपाचे धक्के जाणवण्याची गेल्या आठ दिवसांतील ही तिसरी वेळ आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-06


Related Photos