सोलापूरमध्ये तरुणांनी फटाके फोडल्याने विमानतळ परिसरात लागली आग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / सोलापूर :
येथील  विमानतळ परिसरात फटाके फोडल्याने भीषण आग लागली आहे. आज ९ वाजता परिसरातील काही  लोकांनी फटाके फोडले. या फटाक्यांची ठिणगी तेथील गवतावर पडल्याने मोठी आग लागली. आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे अथक प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवतहानी झालेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ५ एप्रिल रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करा आणि मेणबत्ती-पणती उजळवा, असे  आवाहन देशवासियांना केले होते. या पार्श्वभूमीवर आज सर्व नागरिकांनी ९ वाजता दिवे बंद करुन मेणबत्ती-पणत्या पेटवल्या. पण याच दरम्यान सोलापूरमध्ये काही हुल्लडबाज तरुणांनी फटाके फोडले. त्यामुळे त्या परिसरात मोठी आग लागली.
दरम्यान, मोदींनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करुनही सोलापूरमध्ये काही हुल्लडबाज लोकांनी रस्त्यावर येत फटाके फोडले आहेत. याआधीही मोदींनी देशवासियांना थाळीनाद करण्याचे आवाहन केले होते. तेव्हाही नागरिकांनी रस्त्यावर येत मिरवणूक आणि प्रभात फेऱ्या काढल्या होत्या.
  Print


News - Rajy | Posted : 2020-04-05


Related Photos