मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे ८१ नवे रुग्ण आढळले : राज्यातील रुग्णसंख्या ७४८वर


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
मुंबईसह राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. आज दिवसभरात मुंबईत ८१ नवे कोरोनाबाधित सापडले. तर राज्यात आज एकूण ११३ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्यामुळं राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ७४८ वर पोहोचला आहे.
कोरोना विषाणू राज्यात वेगानं फैलावतो आहे. आज दिवसभरात राज्यात आणखी ११३ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७४८ वर पोहोचला आहे. आज दिवसभरात (महापालिकानिहाय) मुंबई ८१, पुणे १८, औरंगाबाद ४, नगर ३, कल्याण-डोंबिवली २, ठाणे २, उस्मानाबाद १, वसई १ आणि इतर भागात १ असे एकूण ११३ रुग्ण सापडले.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-05


Related Photos