मुंबईत २९ नवे कोरोना रुग्ण आढळले : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६९० वर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
  राज्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज रविवारी कोरोनाच्या नवीन ५५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ६९० वर पोहोचली आहे.
राज्यात आज रविवारी सकाळी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये मुंबईत २९ पुण्यात १७,  पिंपरी-चिंचवडमध्ये ४, अहमदनगरमध्ये ३ आणि औरंगाबादमध्ये दोन रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत चालला आहे. काल शनिवारी  २४ तासांत राज्यात कोरोनाच्या तब्बल १४५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे . 
राज्यात शनिवारी ७०८ जण विविध रुग्णालयात दाखल आहेत. तर कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ हजार ५०४ नमुन्यांपैकी १३ हजार ७१७ जणांचे प्रयोशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तसेच, आतापर्यंत अनेकजण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. 

   Print


News - Rajy | Posted : 2020-04-05


Related Photos