करोनावरून झाला वाद : तरुणाची गोळ्या झाडून केली हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / प्रयागराज :
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील करेली येते करोनावरून झालेल्या वादाचे रूपांतर एका तरुणाच्या हत्येत झाले. लोटन निषाद (३०) असे या तरुणाचे नाव असून ही घटना बक्षी मोदा गावात मृत तरुणाच्या घराबाहेर असलेल्या चहाच्या दुकानाजवळ आज रविवारी सकाळच्या सुमारास  घडली. उपस्थित लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलिसांनी आणखी दोघांना या प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी या तीन आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षकांसह इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत तरुणाच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे. या बरोबरच आरोपींना कडक शासन करण्याचे आदेशही दिले आहेत.
मोहम्मद सोना उर्फ सोनू असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिस अधीक्षकांना या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, प्राथमिक तपासानुसार मोहम्मद सोना याच्या घरासमोर काही व्यक्तींचा एक गट चर्चा करत बसला होता. देशभरात करोना विषाणू संसर्गाबाबत वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यावर ते लोक चर्चा करत होते. त्यांच्यात वाद वाढत गेला आणि त्यांपैकी दोघांनी मोहम्मद सोनावर गोळ्या झाडल्या असा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, मृत तरुण मोहम्मद सोना याच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
  Print


News - World | Posted : 2020-04-05


Related Photos