राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६६१ वर : आणखी सापडले २६ नवे रुग्ण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
  राज्यात कोरोना रुग्णांचा सतत वाढणारा आकडा आता ६६१ वर गेला आहे. राज्यात आज एकूण २६  नवे रुग्ण आढळले आहे. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले  असून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर कोरोना विषाणू भारतात येताच तात्काळ प्रशासकीय यंत्रणेने फैलाव रोखण्यासाठी उत्तम प्रयत्न केले. पण असे असतानाही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढणं ही चिंतेची बाब आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिका १७, पिंपरी-चिंचवडच्या ४, नगरमध्ये ३, औरंगाबाद २ अशी २६  जणांची आज एकूण वाढ झाली आहे. कोरोनाच्या आकडा सातत्याने वाढत असल्यामुळे लोकांना घरीच राहण्याचे आवहन करण्यात आले आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-05


Related Photos