काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात आज रविवारी पाकिस्तानी दहशवाद्यांच्या घुसखोरीला लगाम घालत भारतीय लष्करी जवानांनी ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. कुपवाड्यातील केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेनजिक ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला, तर २ जवान जखमी झाले आहेत. या भागात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने जखमी जवानांचा बचाव करण्याच्या कामात मोठे अडथळे येत आहेत.
दहशतवाद्यांविरोधातील या कारवाईबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे लष्कराने केलेल्या कारवाईत ५ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, तर २४ तासांमध्ये एकूण ९ दहशतवादी ठार झाले आहेत. यांपैकी ४ दहशतवादी काल कुलगाम येथे मारले गेले होते.
कुपवाडा येथे सुरू असलेल्या चकमकीचा आजचा पाचवा दिवस आहे. बुधवारी पाकिस्तानी दहशतवादी नियंत्रण रेषा पार करत भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते. खराब हवामान आणि जोरदार बर्फवृष्टीचा फायदा घेत हे दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते. हे दहशतवादी नियंत्रण रेषा पार करण्यातही यशस्वी झाले. बुधवारी दुपारीच भारतीय जवानांनी या दहशतवाद्यांना घेरले होते. त्यावेळी चकमक देखील झाली, मात्र, बर्फवृष्टी, दाट धुके आणि पावसाचा फायदा घेत हे दहशतवादी घेराव तोडून पळाले. त्यानंतर लष्कराने संपूर्ण भागाला घेरून शोधमोहीम हाती घेतली.
  Print


News - Rajy | Posted : 2020-04-05


Related Photos