पुण्यात २४ तासांत करोनामुळे दोघांचा मृत्यू : राज्यातील मृतांचा आकडा ३४ वर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे :
पुण्यात गेल्या २४ तासांत करोनामुळे दोघांचा मृत्यू झाला असून त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये एका वयोवृद्ध महिलेचा आणि एका ४८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या दोघांच्या मृत्यूमुळे शहरातील मृतांची संख्या चारवर पोहोचली असून राज्यातील मृतांचा आकडा ३४वर पोहोचला आहे.
पुण्यात काल रात्री उशिरा एका ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचा स्वॅब रिपोर्ट रात्री उशिरा आल्यानंतर त्याला करोनाची लागण झाल्याचं निदान झालं, असं सूत्रांनी सांगितलं.
ससून रुग्णालयातच आज एका ६० वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला आहे. ही महिला काही दिवसांपूर्वी नायडू रुग्णालयात अली होती तिची चाचणी घेतली असता ती निगेटिव्ह आल्याने तिला नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, घरी आल्यानंतर ती पुन्हा आजारी पडली होती. तिला उशिरा ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच या महिलेचा मृत्यू झाला आहे. तिचा स्वब चाचणीला पाठविला असता तिचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे निदान झाले असल्याचं पालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यातील करोना रुग्णांची संख्या ६३५वर गेली आहे. तर राज्यात करोनाने आतापर्यंत ३४ जण दगावले असून ५२ लोकांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-05


Related Photos