पाकिस्तान आखतोय धक्कादायक कट : कोरोनाग्रस्त दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याची तयारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
जगातील प्रत्येक छोट्यातला छोटा देश हा सध्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याच्या गुंतला आहे. परंतु पाकिस्तान अद्यापही त्याचे  वाईट कृत्यं करण्यापासून थांबला नाही आहे. पाकिस्तान वारंवार आपल्या मर्यादा ओलांडत आहे. खरंतर पाकिस्तानमध्येही कोरोनाने हाहाकार माजला आहे. परंतु एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एलओसीजवळ लॉन्चिंग पॅडवर जमा झालेल्या दहशतवाद्यांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे हे दहशतवादी आता भारतात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. पाकिस्तान सातत्याने त्यांना भारतात पाठवण्याचा प्रयत्न करीत आहे. मार्ग मोकळा करण्यासाठी एलओसीलाही आगही लावण्यात आली आहे. पाकिस्तानची ही चाल गुप्तचर यंत्रनेमुळे लक्षात आली आहे.
पाकिस्तानने शुक्रवारी भारतीय सुंदरबानी भागात सैन्याच्या चौक्या लक्ष केल्या. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहेत. आकडेवारी पाहिल्यास मार्च महिन्यात पाकिस्तानने ४११  वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. आणि सन २०२० मध्ये आतापर्यंत तीन महिन्यांत १ हजार १६० पेक्षा जास्त वेळा युद्धबंदीचे उल्लंघन झाले आहे. अद्यापही हे उल्लंघन सुरूच आहे.  Print


News - World | Posted : 2020-04-04


Related Photos