राज्यात ४९० जण कोरोनाबाधित तर २६ जणांचा झाला मृत्यू


- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनतेने काळजी घेण्याची आवश्यकता

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जग व देशासह आता महाराष्ट्र राज्यात सुद्धा कोरोना या महाभयंकर विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे ३ एप्रिल २०२० रोजीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. ३ एप्रिल २०२० पर्यंत राज्यातील ४९० जण कोरोनाबाधित असून तब्बल २६ जणांचा कोरोना या महामारीमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व जनतेने संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याची आणि अनावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर जाणे टाळण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या एकट्या मुंबईमध्ये तब्बल २७८ जण कोरोना बाधित असून १८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्या पाठोपाठ पुणे शहर व ग्रामीण भागातील देखील ७० जणांना कोरोनाची बाधा झाली असून २ व्यक्ती कोरोना या महामारीत दगावले आहेत. याशिवाय सांगली जिल्ह्यात २५ जण बाधित आहेत. मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर महानगरपालिका व जिल्ह्यात ५५ जण बाधित असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात १६, अहमदनगरमध्ये २० जण बाधित आहेत. बुलढाणा जिल्ह्यात ५ जण बाधित असून १ जणाचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात ४ जण बाधित असून सातारा, औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येकी ३, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी २, सिंधूदुर्ग, गोंदिया, नाशिक, उस्मानाबाद, वाशिम, जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी १ व गुजरात राज्यात १ जण असे संपूर्ण राज्यात ३ एप्रिल २०२० पर्यंत एकूण ४९० जण कोरोना विषाणूंमुळे बाधित झाले असून २६ जणांचा मृत्यू झाला आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-04


Related Photos