उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला बळी : मृतकाचे वय अवघे २५ वर्ष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / लखनऊ
 : देशभरातील ३८ जणांचा बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे उत्तर प्रदेशमध्ये पहिला बळी घेतला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाने बळी घेतलेल्या या व्यक्तीचे वय अवघे २५ वर्ष असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता कोरोना तरुणांना देखील त्याच्या विळख्यात घेत आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक वृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. ५० हून अधिक वयाच्या, मधुमेह, लठ्ठपणा असे आजार असलेल्या व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमधील एका २५ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने खळबळच उडाली आहे. एवढ्या कमी वयाच्या व्यक्तीचा कोरोनाने म़ृत्यू होण्याची ही देशातील पहिली घटना आहे. याआधी बिहारमध्ये एका ३८ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
  Print


News - World | Posted : 2020-04-01


Related Photos