राज्यात कोरोनाचा आठवा बळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / बुलढाणा :
कोरोना  व्हायरसचा फैलाव राज्यात मोठ्या प्रमाणात  होत आहे. आज राज्यात कोरोनाचा आठवा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिक भीतीचे  वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या आठव्या रुग्णाचे वय फक्त ४५ वर्ष होते. तर मुंबईबाहेरचा हा पहिलाच मृत्यू आहे. काल  शनिवारी सकाळी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेट केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. सदर रुग्णाला न्यूमोनियाचा त्रास वाढल्यामुळे खाजगी रुग्णालयातून सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र नागपूर येथे पाठवलेल्या रिपोर्ट मध्ये या मृत्यू झालेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
हा रुग्ण परदेशातून आला नव्हता किंवा त्याने कोणत्याही प्रकारचा दौरा देखील केला नव्हता. २ दिवस त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाला न्यूमोनियाचा त्रास वाढल्यामुळे खाजगी रुग्णालयातून सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो २ तासांतच मृत पावल्याची माहिती डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे.  शिवाय हा रुग्ण कोणा-कोणाच्या  संपर्कात आला होता याचा देखील तपास घेत असल्याचं डॉ प्रेमचंद पंडित यांनी स्पष्ट केलं आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2020-03-29


Related Photos