संचारबंदीत गरजू लोकांना धान्य वाटपासाठी ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यास मिळणार परवानगी


- सीईओंकडून दोन दिवसात ग्रामपंचायतीला पाठविण्यात येणार पत्र

- जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पाठपुराव्याला यश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सध्या देश, राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात कोरोना विषाणूंनी थैमान घातले आहे. या महाभयंकर विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या व रोजीरोटी करणाऱ्या लोकांचे मोठे हाल होत आहेत. अनेकांना उपाशीपोटी रात्र काढावी लागत आहे. ही समस्या दूर करण्याच्या हेतुने संचारबंदीच्या काळात गरीब, गरजू व मजूर लोकांना धान्य वाटप करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यास परवानगी मिळणार आहे. यासंदर्भात गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजय राठोड यांच्याशी चर्चा केली असून सीईओंच्या मार्फतीने येत्या दोन दिवसात ग्रामपंचायत स्तरावर पत्र पाठविण्यात येणार आहे. यासंदर्भात अजय कंकडालवार यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले असून त्यांच्या प्रयत्नाने गरीब लोकांच्या चेहरयावर हास्य फुलणार असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील १४ व्या वित्त आयोगाचा निधी फवारणी औषधी, हॅन्डवाॅश, साबण व इतर साहित्यांचे वाटप करण्याकरिता खर्च करण्यात यावा. यासोबतच संचारबंदीच्या काळात अनेक गरीब व मजूर लोकांना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तुंसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील मजुरी करून जगणाऱ्या लोकांना कोरोनाच्या संकटात उपाशीपोटी रात्र काढावी लागत आहे. अशा लोकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्याकरिता जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत स्तरावरील १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात यावा, यासंदर्भात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजय राठोड यांच्याशी सविस्तर चर्चा केली. शिवाय प्रशासनाकडे यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला. याबाबत प्रशासनाकडून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागणारया फवारणी औषधे, हॅन्डवाॅश, साबन यासह गरीब व गरजू लोकांना धान्य देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यास प्रशासनाकडून परवानगी मिळणार असून यासंदर्भात जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फतीने येत्या दोन दिवसात पत्र पाठविण्यात येणार आहे. संचारबंदीच्या काळात जिल्हृयातील गरीब व गरजू लोकांची अन्नधान्याची समस्या सुटणार असल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-29


Related Photos