रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून दुचाकीवर बंदी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / रत्नागिरी :
जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात काल शनिवारी रात्री बारा वाजल्यापासून म्हणजेच आजपासून  दुचाकी बंदी जाहिर करण्यात आली आहे. रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी हि दुचाकी बंदी करण्यात आली असून हेल्पिंग हॅंडस् आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने रत्नागिरीत घरपोच किरणा आणि औषधे देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दुचाकी बंदतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्याचे डॉ.मुंढे यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी योग्य कारण असल्यास पास दिले जात आहेत. त्यापाससाठी गर्दी होऊ नये याकरीता एक वेबसाईट पोलीस खात्याने सुरु केली आहे. covid19.mhpolice.in या वेबसाईडवर संबधित व्यक्तींनी नोंद करावी. गरज लागली तरच पोलीस त्यांना बोलावतील असे डॉ.मुंढे यांनी सांगितले.  Print


News - Rajy | Posted : 2020-03-29


Related Photos