ग्रामीण भागात चर्चा फक्त कोरोनाचीच


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मूल :
जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोनाविषयी युध्दपातळीवर प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या दुष्टिने जनजागृती गावागावांत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या जिकडे-तिकडे कोरोना विषाणूची चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे.  राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर या प्रमुख शहरांसह इतर शहरांतही कोरोना पाॅझिटिव्ह तसेच कोरोना संशयित रूग्ण आढळून येऊ लागले आहेत. या संसर्गजन्य विषाणूंपासून सुरक्षित राहण्याकरिता कोणकोणत्या उपाय योजना राबविल्या जाव्यात,  या करिता शासनस्तरावरून ही मोठया प्रमाणावर जनजागृती सुरू केली आहेत. कोरोनाच्या अतिशय चर्चेतून निर्माण होणाऱ्या गैरसमजातून आता भीतिदायक परिस्थिती निर्माण हेाऊ लागली आहे. वास्तविक, प्रतिबंधक उपाययोजनांतून कोरोनाचा संसर्ग टाळता येतो. त्यामूळे कोरोना विषणूबााबत प्रतिबंधक उपाय योजना करणे आवश्यक आहे. परंतु, त्या ऐवजी आता त्याच्या अतिचर्चेतून नागरिकांमध्ये अवास्तव भीती पसरत आहे.
मोबाईल इंटरनेटव्दारे या फसव्या चर्चेचा वेग आता कित्येक पटीने वाढला आहे. व्हाॅटसअप व फेसबुकच्या माध्यमातून हा प्रसार झपाटयाने झाला आहे.
आता ती ग्रामीण भागामध्ये सुध्दा येऊन पोहोचली आहे. प्रत्येक नागरीकांना कोरोनाची धास्ती बसलेली आहे. आज जिकडे तिकडे चर्चा सोडून कोरोनाची चर्चा सुरू आहे, हे विशेष. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2020-03-28


Related Photos