नागपुरात आणखी एक कोरोनाग्रस्त : एकूण रुग्णांची संख्या १० वर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाला आळा बसण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आपण कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात येऊन अधिकाधिक जणांना याची लागण होत असल्याचे समोर येत आहे. आज शनिवारी सकाळी नागपुरात अजून एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता नागपुरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १० झाली आहे. कोरोनाची लागण झालेला हा रुग्ण ४० वर्षांचा पुरुष आहे. दिल्लीला कामानिमित्त गेलेल्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानं हा संसर्ग झाला आहे. 
शहरात संचारबंदी व जमावबंदी लागू असून नागरिकांमध्येही कोरोनाबाबत आता पुरेशा गंभीरतेने जाण आल्याचे दिसते आहे. आधी कोरोनाबाबत बेफिकीर असलेला युवा वर्ग आता चेहऱ्याला मास्क लावून व दोन व्यक्तींमध्ये योग्य ते अंतर राखून वागताना दिसतो आहे.
कोरोनापासून संरक्षण मिळावे म्हणून शासनपातळीवर शर्थीचे प्रयत्न होत आहेत. नागरिकांच्या मनातही कोरोनाबाबत पुरेशी जागरुकता व धास्ती आली आहे. तथापि, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसते आहे. तर दुसरीकडे नागपुरातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण हा बरा होऊन घरी परतला असल्याचेही आशादायक चित्र आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2020-03-28


Related Photos