पारबताबाई विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची : येथील स्थानिक पारबताबाई विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली असून त्यांच्या शैक्षणिक व सामजिक कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.विद्यार्थ्याना चांगल्या सवयी लागाव्या व कॉपी मुक्त रहावे, याकरिता शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. कराडे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. कराडे होते. तर प्रमुख अतिथि म्हणून, सुधाराम सहारे, सामाजिक कार्यकर्त हरिश्चंद्र मडावी, सुरज हेमके, वसंत गुरनूले, क्रुष्णामाई खुने, मडावि आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षक हरिश्चंद्र मडावी तर आभार निर्मला मडावी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्यामराव उंदीरवाडे, मुन्शीलाल अंबादे, कैलाश अंबादे, पराग खरवडे, सुरेश जमकातन आदींने सहकार्य केले.
News - Gadchiroli