कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांनी घरी राहावे व सरकारला सहकार्य करावे : जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सध्या जगात व देशात कोरोना या महाभयंकर विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सरकारने संचारबंदी घालून करून १४ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन केले आहे. या देशातील लोकांच्या आरोग्याला कोणताही धोका पोहचू नये याची खबरदारी म्हणून शासनाने तत्काळ निर्णय घेत कायदे कठोर केले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा कोरोना विषाणूला प्रतिबंध घाहून आपल्या देशातून व जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी अत्यावश्यक नसल्यास बाहेर न पडता घरीच राहावे आणि सरकारला सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले आहे.
चीन या देशातून उत्पत्ती झालेल्या कोरोना या विषाणूंने अल्पावधीतच संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव भारत देशातील विविध राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या झपाट्याने वाढला आहे. लोकांच्या संपर्कातून हा आजार बळावत असल्याने या आजाराच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचा संपर्क कमी करणे हाच एक उपाय आहे. त्यामुळे सरकारने देशातील संपूर्ण राज्यासह महाराष्ट्रात व गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा संचारबंदी करून १४ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांच्या हितासाठी व आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याने नागरिकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावेे. आवश्यकता नसताना कुणीही घराबाहेर पडू नयेे, असेही आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-27


Related Photos