सांगलीत पुन्हा कोरोनाचे १२ नवे रुग्ण आढळले : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २३ तर राज्यातील १४७ वर


- एकाच कुटुंबातील २३ जण  बाधीत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / सांगली : 
जिल्ह्यातील इस्लामपुरात करोनाचे १२ नवीन रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या २३ तर राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता १४७ वर पोहचली आहे.
गंभीर बाब म्हणजे इस्लामपुरात आढळलेले करोनाचे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. कुटुंबातील आधीच्या करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने या सर्वांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे सांगलीत करोना रुग्णांची संख्या २३ पर्यंत गेल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. आरोग्य यंत्रणाही हादरून गेली आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2020-03-27


Related Photos