रिझर्व्ह बँकेचा कर्जधारकांना दिलासा : हफ्ता भरण्यास ३ महिन्यांचा अवकाश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
रिझर्व्ह बँकेने कर्जधारकांना मोठा दिलासा दिला आहे. कर्जधारकांना ईएमआयचा भरणा करण्यासाठी ३  महिन्यांचा अवकाश दिला आहे. याचा अर्थ त्यांचा ३ महिन्यांचा EMI माफ केला जाणार नसून तो भरण्यासाठी अवधी दिला दिला जाणार आहे. कोरोनामुळे ठप्प झालेला व्यापार-उदीम पाहता केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात सर्व वित्तीय संस्थांच्या सर्व प्रकारच्या वसुलीला स्थगिती द्यावी. सर्व प्रकारचे कर्जाचे हप्ते, कॅश क्रेडिटचे व्याज, क्रेडिट कार्डांची बिले आदींचा भरणा तूर्तास स्थगित करावा, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. त्यांच्याप्रमाणेच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही ही मागणी केली होती.
गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी १. ७० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. त्यापाठोपाठ शुक्रवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी रेपो रेटमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे कर्ज स्वस्त होणार आहे. कोरोना आजारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. येणाऱ्या काळात अनेक देशांवर मंदीचं गडद संकट येणार आहे. कोरोनाचा मुकाबला करत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान होऊ नये यासाठी रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे असं दास यांनी सांगितलं.  Print


News - World | Posted : 2020-03-27


Related Photos