महत्वाच्या बातम्या

 जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपींना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत मौजा मन्सर कोद्री हायवे रामटेक येथे ०३ डिसेंबर २०२२ ला ०४.०० ते ०४.४५ वाजताच्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग पोलीस स्टेशन रामटेक येथील पोलीस पथक यांच्यासह पेट्रोलींग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने फोन वाहतूक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून रामटेक पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करून बोलेरो पिकअप क.एम.एन. ५१ जि. १४०१ क्रमांकाच्या गाडीला थांबवून तपासले असता, सदर वाहनात आरोपी वनराज लालचंद रहांगडाले, मुक्तारशहा मकमुदशहा दोघेही रा. चांगाटोला. जि. बालाघाट म. प्र. यांच्या वाहनांचे मागील हाल्यामध्ये वरखाली कप्पे तयार करून ०५ म्हशी, ०२ हले पिकअप क. एम. पी. ५१ / नि १४०१ एकूण किंमती अंदाजे ८ लाख ४० हजार रू. मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेले आहे.

सदर प्रकरणी सरकार तर्फे पोलीस नाईक अजय किशोर वाघमारे, ब नं. ४५४ यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन रामटेक येथे आरोपीविरुध्द कलम 11 (1) (अ) 11 (1) (ड) 11(1) (एफ) 6 प्राण्यांना छळ अधिनियम कायान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील आरोपीतांना अटक करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक अजय किशोर वाघमारे, य. नं. ४५४ हे करीत आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos