महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिना निमित्य अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिना निमित्य त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रामाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे, संतोष कुळमेथे, प्रा.गजानन ढोले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी डॉ. बाबासाहेबांचे देशाकरिता योगदान किती मोलाचे होते, ज्यांनी देशाला संविधान दिला असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अपार कष्ट सहन करून दलितांना गुलामगिरीतून मुक्त केले. व देशाला संविधान देऊन देशात सुव्यवस्था निर्माण केले. स्वताचा विचार न करता ते सतत समाजा करिता झटत राहिले. बाबासाहेबांच्या विचारावर चालणे हे गरजेचे झाले आहे. या महामानवाला डोक्यावर घेऊन नाही तर डोक्यात घालून चालणे आवश्यक आहे तेव्हा कुठे त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण होईल असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी यांनी केले. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून डॉ. आंबेडकर हे फक्त संविधान निर्मातेच होते असे नाही तर ते एक उत्कृष्ट अर्थतज्ञ होते. त्यामुळे त्यानी रिजर्व बँक ऑफ इंडिया या सारख्या बँकेची संकल्पना हिल्टन कमीशन समोर मांडली आणि नंतर हिल्टन कमीशन ने बाबा साहब यांच्या सूचने नुसार RBI च्या स्थापनेचा प्रस्ताव दिला. व अशा प्रकारे १ अप्रैल १९३५ ला भारतीय रिज़र्व बैंकची स्थापना करण्यात आली. कायदे पंडित, अर्थतज्ञ, महामानव इत्यादी व अनेक उपाधी ज्यांना मिळाले आहेत अश्या महानव्यक्तीचे जीवन चरित्र प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकारणे गरजेचे आहे असे मार्ग्दर्शन पार भाष्य प्रा. गजानन ढोले यांनी केले. पर्यवेक्षक अजय वानखेडे यांनीही यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन रहीम पटेल यांनी केले तर आभार आनंद चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos