बिहारमध्ये वर-वधू लॉकडाऊन झाल्याने ऑनलाईन पार पाडला विवाह सोहळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पाटणा :
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशात २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. याच दरम्यान एका वेगळ्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊनमुळे वर-वधू एकत्र येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन लग्न केले आहे. ही घटना बिहारमधील गाझियाबाद, पाटणा येथे घडली.
पाटणाच्या समनपुरा येथे राहणाऱ्या मरहून हाजी मोहम्मद सलाउद्दीन यांची मुलगी सादिया नसरीनचा विवाह गाझियाबादच्या साहिबाबाद येथे राहणाऱ्या सैमुदुल हसन यांचा मुलगा दानिश रजासोबत २३ मार्च रोजी संपन्न झाला. यावेळी वर साहिबाबादमध्ये होता आणि वधू पाटणामध्ये होती. सध्या या विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
लॉकडाऊन घोषित केल्यामुळे वराकडचे मुलीकडे जाऊ शकत नव्हते. तसेच वधूकडेचेही वराच्या घरी येऊ शकत नव्हते. त्यामुळे दोन्ही कुटुंबाच्या परवानगीने ऑनलाईन पद्धतीने विवाह करण्यात आला.  Print


News - World | Posted : 2020-03-25


Related Photos