कोरोनामुळे सर्वोच्च न्यायालय अनिश्चित काळासाठी बंद


-  व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुद्धा होणार नाही  सुनावणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
कोरोना व्हायरसमुळे सर्वोच्च न्यायालय अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी गुंतलेली प्रकरणे यापुढे सुनावली जाणार नाहीत, त्याही रद्द करण्यात आल्या. याआधी, कोर्टाने थेट सुनावणी नाकारली आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करण्यास सांगितले परंतु आज  बुधवारपासून ते देखील थांबविण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयात नियमित दिवसांत १४-१५ खंडपीठ बैठकी होत्या, ज्यामध्ये सुमारे १००० खटले सुनावणीसाठी नोंदवले गेले होते, मात्र, आज तेथे कुलूप लावण्यात आले आहेत. वकिलांचे चेंबरदेखील सील केले आहेत.  Print


News - World | Posted : 2020-03-25


Related Photos