कोरोना : इटलीत २४ तासांत ७४३ जणांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / रोम :
चीनमधील वुहानपासून सुरू झालेला कोरोना चा कहर इटलीमध्ये सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून इटलीमध्ये दररोज मृत्यूची संख्या कमी होत होती. मात्र, मंगळवारी मृतांची संख्या पुन्हा वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी एकाच दिवशी ७४३ जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीत एकूण मृतांचा आकडा ६ हजार ८२० इतका झाला आहे.
मंगळवारी इटलीमध्ये ५ हजार २४९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इटलीत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही ६९ हजार १७६ इतकी झाली आहे. त्यातील ८ हजार ३२६ जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तर, ५४ हजारजणांवर उपचार सुरू आहेत. त्याचील ३ हजार ३९३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मागील काही दिवसांत इटलीमध्ये मृतांची सरासरी संख्या इतकीच आहे.  Print


News - World | Posted : 2020-03-25


Related Photos