महत्वाच्या बातम्या

 महिन्याच्या चौथ्या बुधवारला ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदने प्राप्त होत असल्याने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्येक महिन्यातील चौथ्या बुधवारला ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. चौथ्या बुधवारला सकाळी 11 ते 12 या वेळेत ज्येष्ठ नागरिक दिवस आयोजित करण्यात येणार आहे.

दिवस अगोदरच म्हणजे प्रत्येक महिन्यातील चौथ्या मंगळवारला ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज, निवेदन सहाय्यक अधीक्षक, गृह विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांच्याकडे स्वीकारण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या काही समस्या असतील तर त्यांचे निराकरण होण्यासाठी  अर्ज, निवेदन सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos