पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहेत. देशभरात आतापर्यंत ५०८ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आठवड्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर लोकांना संबोधित केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करत आपण रात्री देशाला संबोधित करणार असल्याचे जाहीर केले. पंतप्रधान मोदी आपल्या ट्विटमध्ये लिहितात, 'जागतिक साथीचा आधार असलेल्या करोना विषाणूच्या उद्रेकाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी मी देशातील नागरिकांना सांगणार आहे. आज, २४ मार्चच्या रात्री ८ वाजता मी देशाला संबोधित करेन.'
दरम्यान, देशात करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक १०१ रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. केरळमध्ये करोनाचे एकूण ९५ रुग्ण आहेत. या जीवघेण्या विषाणूमुळे देशभरात एकूण १० लोकांचा मृत्यू झाला आहे.

 
  Print


News - World | Posted : 2020-03-24


Related Photos