महत्वाच्या बातम्या

 सोलापूर मधील ११ गावांनी केला कर्नाटकात जाण्याचा ठराव : जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्र व्यवहार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / सोलापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला गंभीर वळणावर येवून पोहचला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील 42 गावं कर्नाटकात जाण्याचा वाद अखेर मिटला असतानाच आता नवा वाद निर्माण झाला आहे. सोलापुरमधील अक्कलकोट तालुक्यातील 11 गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव केला आहे. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादा पुन्हा पेटणार आहे. 

अक्कलकोट तालुक्यातील 11 गावांनी कर्नाटकात जाण्याबाबत केलेला ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाला सुपूर्द केला आहे. मूलभूत सुविधा पुरवता येत नसतील तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या या आशयचा ठराव या 11 गावच्या ग्रामस्थांनी केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील  शेगाव, कोर्सेगाव, कांदेवाडी खुर्द, देवीकवठे, कलकर्जाळ, शावळ, शेगाव बुद्रुक, हिळ्ळी, आळगे, मंगरुळ आणि धारसंग या ग्रामपंचायतींनी केला आहे. 

सांगलीच्या जत तालुक्यातील 42 गावं कर्नाटकात जाण्याचा वाद अखेर मिटला आहे. पाण्यापासून वंचित असलेल्या 42 गावातील दुष्काळग्रस्तांशी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज थेट संवाद साधला. म्हैसाळ विस्तारीत पाणी योजना लवकर पूर्ण जाईल आणि तोपर्यंत 42 गावांना पाणी देण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली. तेव्हा पाणी मिळाले तर कर्नाटकात जाणार नाही, असे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी स्पष्ट केले. सरकारने आश्वासन पाळले तर मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळू नये यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांचा उद्याचा कर्नाटक दौरा रद्द झाला आहे. दौरा रद्द झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. सीमा वादाचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल, आम्हाला कर्नाटकात जाण्यापासून कोणीही रोखु शकत नाही असे ते म्हणाले. यासंदर्भातला अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. दरम्यान कर्नाटक मुख्य सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले. कायदा सुव्यवस्थेच्या कारणामुळे दोन कॅबिनेट मंत्र्यांनी बेळगाव दौरा करु नये, असे या पत्रात म्हटले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos