महत्वाच्या बातम्या

 संकोच न बाळगता समाजात एच.आय.व्ही. बाबत जनजागृती करा : राहुल कर्डिले


- जागतिक एड्स दिनानिमित्य जनजागृती रॅली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : एचआयव्ही एड्सबाबत संकोच न बाळगता या विषयावर मोकळेपणाने समाजात जनजागृती करा तसेच एचआयव्ही बाधितांशी भेदभाव करु नका, असे प्रतिसाद जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जागतिक एड्स दिनानिमित्य एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज.पराडकर, नोबल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रविण हिवरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नुरुल हक शेख आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सीईओ रोहन घुगे, विवेक देशमुख, डॉ. सचिन तडस व डॉ. पराडकर यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. तात्पुवी एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, सामान्य रुग्णालयाच्यावतीने जिल्हा परिषद  येथून एड्स जनजागती रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.

रॅली शहरातील आंबेडकर चौक, झाशी राणी चौक, सुभाष चौक ते परत जिल्हा परिषद येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी स्लोगनच्या माध्यमातून एड्स प्रतिबंधात्मक संदेश दिला तसेच पथनाट्य सुध्दा सादर करण्यात आले. रॅलीमध्ये विविध शैक्षणिक संस्थातील एक हजार विद्यार्थी, सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नुरुल हक शेख यांनी केले.

कार्यक्रमाला अमीत करमणकर, मनिष कुटे, नितीन साखरे, विजय ओझा, अमित छल्लानी, जोत्सना गावंडे, आनंद काळबांडे, माधुरी भोयर, सारिका ढोके, शुभांगी रेवतकर, निवेदन उके, मुख्तार शेख, किशोर वाघमारे, नोबल शिक्षण संस्था, उत्कर्ष जनकल्याण शिक्षण संस्था, विहान संस्था यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात शासकीय नर्सिग स्कुल, शालोम नर्सिग स्कुल, कुंभलकर समाजकार्य महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, इंद्रप्रस्थ न्यू आटर्स कॉलेज, राधिकाबाई मेघे नर्सिग स्कुल, पार्वतीबाई नर्सिग स्कुल, जीएस कॉलेज, अनिकेत कॉलेज, यशवंत कॉलेज, राघोबाजी भोयर इन्स्टीट्यूट ऑफ फार्मासिटीकल व शहरातील विविध शैक्षणिक संस्थांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदविला.





  Print






News - Wardha




Related Photos