जनता कर्फ्यू दरम्यान तंबाखूची 'तलफ' पडली महागात


- पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवडली 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : 
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला होता. नागरिकांना घराबाहेर न पडण्याची विनंती केली असतानाही काही जणांनी हे आवाहन पायदळी तुडवत बाहेर फिरत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी आदेश काढला असतानाही आदेशाला केराची टोपली दाखवणार्‍या तरुणालाही ट्राफिक पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
संबंधित तरुणाला तंबाखूची तलफ आल्याने तो घराबाहेर पडला होता. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी एकीकडे नागरिकांसह प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना अशा प्रकारची कारण सांगून हा तरुण बाहेर फिरत होता. त्यामुळे तरुणाला वाहतूक पोलिसांनी थांबवित विचारले असता, त्याने तंबाखू खायची असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा पार चढला, त्यांनी दांडक्याने तरुणाला फटके देऊन घरी जाण्यास सांगितले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर युझर्सनी पोलिसांनी दिलेल्या शिक्षेचं समर्थन केले आहे. सरकारचे आदेश न पाळणार्‍यांना अशीच शिक्षा व्हायला हवी असे एका युझरने नमूद केले आहे. हा व्हिडीओ पुण्यातील असल्याचा दावा केला जात आहे  Print


News - Rajy | Posted : 2020-03-23


Related Photos