महत्वाच्या बातम्या

 पीएलजीए सप्ताह दरम्यान अहेरी उपविभागातील नागरिकांकडून भरमार बंदूके पोलिसांच्या स्वाधीन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : २ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताह दरम्यान पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे यांच्या नेतृत्वात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असून, उपविभाग अहेरी अंतर्गत उप.पो.स्टे. पेरमिली हद्दीतील नागरिकांनी ०८ भरमार बंदुका १ बॅरल पोलीसांच्या स्वाधीन केले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपारिक शेती व्यवसायासोबतच शिकार करून उदरनिर्वाह करतात. शिकार करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका चाळगत असते. अशाच प्रकारच्या वडीलोपार्जित बंदुका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत. दुर्गम अतिदुर्गम भागात नक्षलवादी याच बाबीचा फायदा घेवून, सर्वसामान्य जनतेला नक्षल चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात. याकरीता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतुन अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या बंदुका स्वइच्छेने जवळच्या पोलीस स्टेशन येथे स्वाधिन करावे, असे आवाहन करण्यात आले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपविभाग अहेरी अंतर्गत उप.पो.स्टे. पेरमिली हद्दीतील मौजा गट्टेपल्ली, रापल्ले, येरमनार, येरमनार टोला चंद्रा व कुडकेली गावातील नागरिकांनी त्यांच्याकडे बाळगलेल्या ८ भरमार बंदुका व १ बॅरल १ डिसेंबर २०२२ रोजी अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या समक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अहेरी येथे स्वाधिन केले. नागरिकांनी स्वइच्छेने त्यांच्याकडील बंदुका स्वाधिन केल्यामुळे, बंदुका स्वाधिन करणाऱ्या नागरिकांचा अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) पतिश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या नेतृत्वात उप.पो.स्टे. पेरमिलीचे प्रभारी अधिकारी धवल देशमुख, पो.उप.नि. सोनवणे, पो.उप.नि. अजिंक्य जाधव, पो.शि. केशव गुरनुले, पो.शि. राहुल स्वारडे, पो.शि. ब्रिजेश सिडाम, पो.शि. राकेश उरवेते,  पो.शि. पंकज दंडिकवार,पो.शि. सुरज करपेत व उप.पो.स्टे. पेरमिलीचे पोलीस पथकांनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos