जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासह परिवाराने टाळ्या, थाळ्या वाजवून केला घंटानाद


- जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरी येथील आपल्या निवासस्थानी आज, २२ मार्च रोजी सायंकाळी संपूर्ण परिवारासह टाळ्या, थाळ्या वाजवून घंटानाद केला व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने पुकारलेल्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 
कोरोनामुळे उद्भवलेल्या धोक्याच्या परिस्थितीत सतर्क राहण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानुसार जनता कर्फ्यूचेही आवाहन केले होते. या जनता कर्फ्यूमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हे सुद्धा संपूर्ण परिवारासह सहभागी झाले. त्यानंतर सायंकाळी टाळ्या, थाळ्या वाजवून घंटानाद केला. या जनता कर्फ्यूमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासह त्यांच्या पत्नी अहेरी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सोनाली अजय कंकडालवार, इंदाराम ग्रामपंचायतीचे उपसरपंच वैभव कंकडालवार, रामन्नाजी कंकडालवार, मंदाताई कंकडालवार, मायाबाई कंकडालवार, युवराज कंकडालवार, विराज कंकडालवार, प्रियंका पेंदाम आदी सहभागी झाले होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-22


Related Photos