राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला : रुग्णांची संख्या ६३ वर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
  कोरोना व्हायरसने  राज्यात निर्माण झालेले  संकट अधिक गहिरं होताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा कालपर्यंत ५२ असलेला आकडा आज थेट ११ ने वाढून ६३ वर पोहोचला आहे. यात मुंबईतील दहा तर पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली. 'महाराष्ट्र सध्या 'करोना'च्या दुसऱ्या टप्प्यात आहे. मात्र, परिस्थिती अशी कायम राहिल्यास चिंता वाढू शकते, असं टोपे म्हणाले. राज्यातील एकूण ६३ रुग्णांपैकी १४ लोकांना संसर्गातून करोनाची लागण झाली आहे. आज सापडलेल्या ११ रुग्णांपैकी आठ जण विदेशातून आले होते. तर, तिघांना संसर्गातून लागण झाल्याचं टोपे यांनी सांगितलं.  Print


News - Rajy | Posted : 2020-03-21


Related Photos