महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५२ वर : मुंबई, पुण्यात ३ नवे रुग्ण आढळले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५२ वर पोहोचला आहे. आज मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एक असे आणखी ३ रुग्ण आढळून आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली. कोरोना आजार बरा होत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. जे रुग्ण दाखल करण्यात आले आहे. त्यातील काही रुग्णांना डिस्चार्ज दिला जाईल, पण त्यांना होम क्वारांटाइन राहावे लागेल, अशी दिलासादायक माहिती टोपे यांनी दिली.
मात्र, महाराष्ट्रात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबई, पिंपरी आणि पुण्यात आणखी ३ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ही ५२  वर पोहोचली आहे, असंही टोपे यांनी सांगितलं.
  Print


News - Rajy | Posted : 2020-03-20


Related Photos