नाशिकमध्ये परदेशातून आलेले कोरोनाचे चार संशयित रुग्ण फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नाशिक :
परदेशातून आलेले आणि कोरोना व्हायरसचे चार संशयित रुग्ण नाशिकच्या इगतपुरी येथून फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमधील आरोग्य पथक त्यांच्या मागावर असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येत आहे.
मिळालेली माहिती अशी की, इगतपुरी येथील एका कुटुंबील चार जण काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात गेलं होतं. ते परत आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइनसाठी सूचित करण्यात आलं होतं. मात्र, ते आता फरार झाले आहेत. आरोग्य पथक त्यांचा शोध घेत आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ५२  वर पोहोचली आहे. नाशिकमध्ये ४३ संशयित आढळून आले होते. दिलासादायक बाब म्हणजे, यातील ३४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2020-03-20


Related Photos