महत्वाच्या बातम्या

 राज्य सरकारने २०२३ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना २४ सुट्या केले जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्य सरकारने २०२३ या वर्षासाठी सार्वजनिक सुट्या जाहीर केले आहेत. त्यानुसार आगामी वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण २४ सुट्या मिळाले आहेत, मात्र त्यामधील चार सुट्या शनिवार आणि रविवार आल्यामुळे बुडाल्या आहेत.

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी, महाशिवरात्री १८ फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी, होळी (रंगपंचमी) ७ मार्च, गुढीपाडवा २२ मार्च, रामनवमी ३० मार्च, महावीर जयंती ४ एप्रिल, गुड फ्रायडे ७ एप्रिल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल, महाराष्ट्र दिन १ मे, बुद्ध पौर्णिमा ५ मे, बकरी ईद २८ जून, मोहरम २९ जुलै, स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट, पारसी नववर्ष दिन १६ ऑगस्ट, गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर, ईद ई मिलाद २८ सप्टेंबर, महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर , दसरा २४ ऑक्टोबर, दिवाळी लक्ष्मीपूजन १२ नोव्हेंबर, गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर, ख्रिसमस २५ डिसेंबर अशा मिळून २४ सार्वजनिक सुट्या सरकारने जाहीर केले आहेत.

मात्र महाशिवरात्री, रमजान ईद आणि मोहरम हे सण शनिवारी तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि दिवाळी लक्ष्मीपूजन रविवार असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या या हक्काच्या चार सुट्या बुडाल्या आहेत. हल्ली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा आहे.

एका वर्षात १६५ सुट्या 

सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्यांवर  विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत अल्पकालीन चर्चेत भाग घेताना नाराजी व्यक्त केले होते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षात १६५ सुट्टया मिळतात. वर्षातले सहा महिनेच कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांच्या सुट्यांचा गांभीर्याने विचार करा, अशा शब्दांत अजित पवार यांनी सरकारी सुट्यांवर नाराजी व्यक्त केले.





  Print






News - Rajy




Related Photos