पंजाबमध्ये कोरोनाग्रस्ताचा मृत्यू : देशात चौथा बळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
देशातील कोरोना संक्रमित मृत्यूंची संख्या आता चार वर पोहचलीय. आज गुरुवारी पंजाबमध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे . या अगोदर दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक करोनाचा बळी गेला आहे . केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे . पंजाबच्या नवाशहर जिल्ह्यातील एका रुग्णालयात ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू कोरोना संक्रमणामुळे झाल्याचे  उघड झाले आहे . वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा व्यक्ती दोन आठवड्यांपूर्वी जर्मनीहून - इटली - भारत असा प्रवास करत मायदेशात दाखल झाला होता. छातीत दुखत असल्याची तक्रार घेऊन तो रुग्णालयात दाखल झाला होता.
मृत व्यक्तीला मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे  डॉक्टरांचे  म्हणने आहे. या व्यक्तीचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते वैद्यकीय अहवालानुसार, हा व्यक्ती कोरोना संक्रमित असल्याचे  आढळले . बुधवारी बांगा सामुद्यिक आरोग्य केंद्रात त्याचा मृत्यू झाला.
देशात आत्तापर्यंत कोरोनाबाधित १७२ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये २५ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. करोनामुळे आत्तापर्यंत देशात चार जणांनी आपले प्राण गमावले असले तरी १४ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. उपचारानंतरदेखील या रुग्णांचा फॉलोअप आरोग्य प्रशासनाकडून घेण्यात येतोय.
  Print


News - World | Posted : 2020-03-19


Related Photos