निर्भयाच्या दोषींना उद्याच फाशी होणार : न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
 निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका आज गुरुवारी न्यायालयाकडून फेटाळण्यात आली. तसेच पवन गुप्ता आणि अक्षयकुमार सिंह यांनी दुसऱ्यांदा केलेली दया याचिकाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली. त्यामुळे निर्भयाच्या दोषींना उद्याच फाशी होणार हे निश्चित झाले आहे. 
उद्या सकाळी ५. ३० वाजता मुकेशकुमार सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघांना फाशी देण्यात येईल. त्यासाठी तिहार तुरुंगात सर्व तयारी झाली आहे. फाशी देणारा जल्लाद पवनही दोन दिवसांपूर्वीच तिहार तुरुंगात दाखल झाला होता. यानंतर फाशी देण्याची तालीमही झाली होती. त्यानुसार आता उद्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाईल. दरम्यान, कोर्टाबाहेर दोषी अक्षयची पत्नी पुनिता देवी बेशुद्ध पडून खाली कोसळली.
  Print


News - World | Posted : 2020-03-19


Related Photos