रंजन गोगोई यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. गोगोई यांच्या नावाची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली होती. रंजन गोगोई यांनी मागील अनेक वर्षांपासून सर्वोच न्यायालयात प्रलंबित असलेल्या राममंदिर जन्मभूमीप्रकरणी ऐतिहासिक निर्णय सुनावला होता. तसेच अनेक प्रलंबित आणि वादग्रस्त प्रकरणे त्यांनी निकली काढली होती. गोगोई यांनी ३ ऑक्टोबर २०१८  रोजी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला होता. ते १७ नोव्हेंबर २०१९ रोजी निवृत्त झाले होते.
सरकारनं काढलेल्या अधिसूचनेत केलेल्या उल्लेखानुसार, 'हिंदुस्थानच्या संविधानाच्या अनुच्छेद ८० च्या खंड (३) सोबत पठित खंड (१) च्या उपखंड (क) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करत राष्ट्रपती, एका नामित सदस्याच्या सेवानिवृत्तीच्या कारणाने रिक्त झालेली जागा भरण्यासाठी, राज्यसभेत रंजन गोगोई यांना नामांकीत करत आहेत', असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले होते.  Print


News - World | Posted : 2020-03-19


Related Photos