कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २५ लाखांचे नियोजन


- जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची डीएचओ डाॅ. शंभरकर यांच्याशी चर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
परदेशात उत्पत्ती झालेलया कोरोना या महाभयानक विषाणूचा प्रादुर्भात भारतातील सर्वच राज्यात पसरला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि कोरोना विषाणूच्या निर्मूलनासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेमार्फत २५ लाख रुपयांचे नियोजन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मनोहर पाटील पोरेटी यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. त्यासंदर्भात कंकडालवार यांनी आज, १८ मार्च २०२० रोजी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शशीकांत शंभरकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात रोखण्यासाठी आणि विशेष खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून एनआरएचएम ६ लाख रुपये आणि १३ वने मधून उर्वरित निधी असा एकूण २५ लाख रुपयांच्या निधीचे नियोजन जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मनोहर पाटील पोरेटी यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. या निधीतून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सॅनिटरिन माॅस्क व इतर साहित्य संबंधितांना पुरविण्यात येणार आहेत. कोरोना विषाणूच्या समूळ उच्चाटनासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष कंकडालवार यांनी तत्काळ पुढाकार घेउन आज जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शशीकांत शंभरकर यांच्याशी चर्चा करून निधीचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा अधिकारी व कर्मचार्यांना तसेच सर्वसामान्य जनतेला प्रादुर्भाव होऊ नये याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. याकरिता सॅनिटरिन माॅस्क व इतर साहित्य पुरविण्याकरिता २५ लाख रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-18


Related Photos