महत्वाच्या बातम्या

 खेलो इंडिया धनुर्विद्या प्रशिक्षणार्थीनी गिरविले ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षनांचे धडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात येत असलेल्या आष्टी येथे भारतीय खेळ प्राधिकरण द्वारा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली, यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र तथा राज्य सरकारच्या मान्यतेनुसार खेलो इंडिया अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथील जिल्हयात नावलौकिकास आलेल्या खेलो इंडिया सेंटर महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथे खेलो इंडिया धनुर्विद्या प्रशिक्षणार्थीनी गिरवले. ऑनलाईन पध्दतीने धनुर्विद्या खेळांचे धडे सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले, व सोबतच समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भारत पांडे उपस्थित होते. कार्यक्रमांचे मार्गदर्शक पायलट प्रोजेक्ट फॉर प्रमोशन ऑफ स्पोर्ट्स अमोंग त्रिबल स्टुडंट्स इन गडचिरोली डिस्ट्रिक्ट येथील रोशन सोळंके यांनी प्रशिक्षणार्थंना मंचावरून पायलट प्रोजेक्ट फॉर प्रमोशन ऑफ स्पोर्ट्स अमोंग त्रिबल स्टुडंट्स इन गडचिरोली डिस्ट्रिक् येथील रोशन सोळंके यांनी प्रशिक्षणार्थीना मैदानात खेळत असताना होणाऱ्या चुका लक्षात आणून दिल्या व त्यावर कश्याप्रकारे नियंत्रण करायचे याविषयी अचूक असे मार्गदर्शन केले. तसेच लोएड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कोनसरी येथील कंपनीचे ज्युनियर स्पोर्ट्स ऑफिसर पुत्कर सिंकु व बुधन सिंघ सिंकू यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्याम कोरडे यांनी मान्यवरांना धनुर्विद्या खेळा बद्दल सविस्तर माहिती दिली. अशा प्रशिक्षण केंद्रात परिसरातील खेळाडू विद्यार्थ्यांना प्राध्यापक श्याम कोरडे, प्रशिक्षण देतात. या वेळी डॉ. राज मुसणे, प्राध्यापक रवि गजभिये, प्राध्यापक डॉ. भारत पांडे, डॉ. रवी शास्त्रकार, डॉ. खुणे, तसेच धनुर्विद्या खेळातील कलरकोट खेळाडू नितेश डोके, अरविंद वनकर व इतर प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. तर कार्यक्रम चे सूत्रसंचालन प्राध्यापक श्याम कोरडे तर आभार पूजा डोर्ली कर हिने मानले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos