डीजे वाजवून मिरवणुकीत नाचगाणे करणाऱ्या १३ आरोपींना प्रत्येकी ८०० रुपये दंडाची शिक्षा


- न्यायदंडाधिकारी बोरफळकर यांचा न्यायनिर्वाळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
डीजे वाजवून मिरवणुकीत नाचगाणे करणाऱ्या १३ आरोपींना प्रत्येकी ८०० रुपये दंडाची शिक्षा गडचिरोली येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एन. सी. बोरफळकर यांनी १६ मार्च २०२० रोजी सुनावली आहे. याबाबत सविस्तर असे की, आरोपी एकनाथ श्रावण शेंडे, निखील एकनाथ शेंडे, सुनीता कालीदार शिलेदार, प्रेमिला मुन्ना शिलेदार, बन्नु किशोर शिलेदार, गोपाल रामलाल शिलेदार, किशोर टिकाराम शिलेदार, प्रवीण दिलीप भोयर, अमन रवींद्र नागापुरे, सर्व रा. गोकुळनगर, गडचिरोली, रामकृष्ण आडकुजी डोनाडकर रा. वाकडी, प्रभाकर पद्माकर शेंडे रा. गोगाव, दिनेश सज्जन शिलेदार, राहूल सज्जन शिलेदार रा. गोकुळनगर या सर्वांनी मिळून डीजे वाजवून मिरवणूक काढण्याची परवानगी न घेता घरगुती गणेश विसर्जनाच्या वेळी डीजे वाजवून मिरवणूक काढली. त्यावरून सदर १३ लोकांवर पोलिस स्टेशन गडचिरोली येथे अपराध क्र. ४०२/२०१८ कलम २९०, २९१, १४३, १८८ भादंवि मु. पो. का. १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार भुवनेश्वर गुरनुले यांनी तत्कालीन पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य रितीने करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. दरम्यान, १६ मार्च २०२० रोजी गडचिरोली येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एन. सी. बोरफळकर यांच्या न्यायालयानेे सदर १३ आरोपींना कलम १४३ भादंवि अन्वये २०० रुपये दंड व दंड न भरल्यास २ दिवस साधा कारावास, कलम १८८ भादंवि अन्वये १०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ दिवस साधा कारावास, कलम २९० भादंवि अन्वये २०० रुपये दंड व दंड न भरल्यास २ दिवस साधा कारावास, कलम २९१ भादंवि अन्वये १०० रुपये दंड व दंड न भरल्यास २ दिवस साधा कारावास, कलम १३५ मु. पो. काय. अन्वये २०० रुपये दंड व दंड न भरल्यास २ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अमर फुलझेले, कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सोरते यांनी योग्यरित्या काम पाहिले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-17


Related Photos