महत्वाच्या बातम्या

 एच.आय.व्ही.लस उपलब्ध होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वुत्तसंस्था / नवी दिल्ली  : जागतिक एड्‌स दिन नुकताच १ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने जगभरात अनेक कार्यक्रम आणि आरोग्य विषयक उपक्रम राबवण्यात आले. एड्‌स बाबत नेहमीच आरोग्य विषयक संशोधन सुरू असते. आता एका नव्या माहिती प्रमाणे एच.आय.व्ही.वरही लस लवकरच उपलब्ध होणार असून या लसीबाबत प्रयोगशाळेत जे प्रयोग करण्यात आले. त्यामध्ये ९७% यश मिळाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. एच. आय. व्ही. च्या व्हायरसमुळे एड्‌स या रोगाचा प्रसार होतो याची कल्पना आता सर्वांनाच आहे. त्यामुळे आता एड्‌सला कारणीभूत ठरणाऱ्या एच.आय.व्ही. लाच नियंत्रणात ठेवण्यासाठी ही लस महत्त्वाची ठरणार आहे. शास्त्रज्ञांनी शोधलेल्या या लसीचा प्रयोग ४८ लोकांवर करण्यात आला. या लोकांचा वयोगट १८ ते ४० असा होता. त्यापैकी १८ लोकांना प्रथम लसीचा पहिला डोस देण्यात आला, त्यानंतर ८ आठवड्यांनी त्यांना दुसरा डोस देण्यात आला. आणखीन १८ लोकांना या लसीची मात्रा थोडी वाढवून आठ आठवड्यांच्या अंतराने दोन डोस देण्यात आले. उरलेल्या १२ लोकांना मात्र कोणताही डोस देण्यात आला नाही ज्या ३६ लोकांना या लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. त्यापैकी ३५ लोकांची इम्युनिटी म्हणजेच प्रतिकार क्षमता वाढल्याचे लक्षात आले. दुसऱ्या डोसनंतर या लोकांच्या इम्युनिटीमध्ये अधिकच वाढ झाल्याचे लक्षात आले. एच. आय. व्ही. व्हायरस मानवी शरीरातील इम्युनिटी म्हणजेच प्रतिकारक क्षमताच कमी करत असल्याने आता या लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिकारक क्षमता वाढवण्याचे काम होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहिती प्रमाणे जगात सध्या तीन कोटी ८० लाख लोक एच.आय.व्ही.चा आजार घेऊन जगत आहेत. गेल्या काही वर्षांच्या कालावधी मध्ये एच.आय.व्ही. विषाणूवर लस शोधण्यासाठी २० पेक्षा जास्त प्रयोग करण्यात आले, पण आता करण्यात आलेला हा नवा प्रयोग सर्वात जास्त यशस्वी मानण्यात येत आहे. एड्‌सने आत्तापर्यंत जगभरात चार कोटी पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. २०२१ या एका वर्षात जगभरात १५ लाख लोकांना एड्‌स झाला.





  Print






News - World




Related Photos