माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची सरकारने सोमवारी राज्यसभेवर निवड केली. याबाबतची अधिसूचना गृहमंत्रालयाने जारी केली आहे. राष्ट्रपती नियुक्त सदस्यांपैकी एकाच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी घटनेच्या अनुच्छेद ८०(१)(अ) अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपतींनी रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती केली, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. काँग्रेसचे केटीएस तुलसी यांच्या निवृत्तीमुळे ही जागा रिक्त झाली होती.
ऐतिहासिक अयोध्या खटल्याचा गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला निकाल देणाऱ्या पाच सदस्यांच्या खंडपीठाचे अध्यक्ष गोगोई हे होते. त्याच महिन्यात १७ तारखेला ते निवृत्त झाले. ३ ऑक्टोबर २०१८ रोजी न्या. गोगोई यांनी सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारली होती. शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश आणि राफेल विमान खरेदीचा व्यवहार यांसारख्या प्रकरणांत निकाल देणाऱ्या खंडपीठांचेही ते प्रमुख होते. राफेल खरेदी प्रकरणात चौकशीची मागणी त्यांच्या खंडपीठाने दोनदा फेटाळून लावली होती.
गेल्या वर्षी न्या. गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोपही झाला होता. मात्र, आपल्याविरोधात हे षडम्यंत्र असल्याचा आरोप न्या. गोगोई यांनी केला होता. या प्रकरणात ते निर्दोष असल्याचे चौकशी समितीने म्हटले होते.  Print


News - World | Posted : 2020-03-17


Related Photos