आज दुपार पासून शिर्डीमधील साई मंदिर अनिश्चित काळासाठी बंद


- आता फक्त ऑनलाईन दर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / शिर्डी :
'करोना'चा फैलाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शिर्डी येथील साई समाधी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थानानं घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत मंदीर, प्रसादालय आणि भक्तनिवास देखील बंद राहणार आहेत.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी ही माहिती दिली. आज दुपारी तीन वाजल्यापासून बंदची अंमलबजावणी सुरू होणार आहे. गुरुवारी निघणाऱ्या पालखीत केवळ चार पुजारी सहभागी होणार आहेत. मात्र, ऑनलाइन दर्शन, लाइव्ह टेलिकास्ट व संस्थानचे कार्यालयीन कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती डोंगरे यांनी दिली.
  Print


News - Rajy | Posted : 2020-03-17


Related Photos