मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जमावबंदीचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई :
मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यासाठी आता मुंबईमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. मुंबई पोलिसांनी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज मुंबईत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होतो. यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळण्यात यावा असे अवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. यासोबतच पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये, असेही मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केले तर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
आता राज्यभरात कोरोनाचे ३२ रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. ३१ मार्चपर्यंत मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान कोणीही पॅनिक होऊ नये असे अवाहन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2020-03-15


Related Photos