महत्वाच्या बातम्या

 खासदार रामदास तडस यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांची घेतली औपचारीक भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांची नवी दिल्ली येथे खासदार रामदास तडस यांनी सदिच्छा भेट घेतली. जानेवारी २०२३ मध्ये नियोजित असलेल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय येथे कुस्तीच्या भव्य स्टेडीयमच्या लोकार्पण कार्यक्रम करिता निमंत्रण दिले, तसेच विविध विषयावर चर्चा केली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी वर्धा येथे जानेवारी २०२३ मध्ये येण्याचे आश्वासन दिले.





  Print






News - Wardha




Related Photos